सोलापूर दि. 10 : सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने 9 डिसेंबर 2025 रोजी डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांची पुण्यतिथी निमित्त साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक येथील डॉ. द्वारकानाथ कोटणीस स्मारक येथील पुतळ्यास व महानगरपालिकेच्या कौन्सिल हॉलमधील आयुक्त कार्यालयात द्वारकानाथ कोटणीस यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी महापालिकेचे कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी अजितकुमार खानसोळे, अशोक खडके, सिद्राम तम्मागी आणि इतर कर्मचारी नागरिक उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालय येथील डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या पुतळ्यास कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी अजितकुमार खानसोळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आदी मान्यवर उपस्थिती होते.
