सोलापूर : राज्याच्या २९ महापालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत आज जाहीर झाली आहे. यामध्ये सोलापूर महापालिकेचाही समावेश आहे. आरक्षण सोडतीनुसार सोलापुरात खुल्या प्रवर्गातील महापौर होणार आहे.
महानगरपालिकेच्या निकालांनी संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. सोलापूरकरांनी यंदा कोणा एका पक्षाला कौल दिला नसून, भाजपच्या बाजूने अक्षरशः विजयाची लाट निर्माण केली आहे. १०२ जागांच्या या सभागृहात भाजपने तब्बल ८७ जागा जिंकून ऐतिहासिक आणि ‘एकतर्फी’ विजय नोंदवला आहे.
