सोलापूर दि. 19 : सोलापूर महापालिका निवडणुकीत सम्राट चौक, माने वस्ती परिसरातील सामाजिक कार्यकर्ते भीम संघर्ष प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सिद्धांत दीपक नागटिळक यांनी प्रभाग एक मधून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून इच्छुक उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चंद्रकांत पवार प्रशांत बाबर बंटी जानराव व पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सिद्धांत नागटिळक यांनी प्रभागातील नागरिकांची इच्छा असल्याने व प्रभागातील स्थानिक उमेदवार म्हणून सेवा करण्यासाठी माझी उमेदवारी असल्याचे सांगितले.
