सोलापूर दि. 10 : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचे प्रभाग पाचचे अधिकृत उमेदवार शिवम बलभीम सोनकांबळे, अर्चना अमर रजपूत, माधवी उमेश काळे, सुजीत लक्ष्मण कोकरे यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांची भव्य पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे.

ही पदयात्रा 11 जानेवारी 2026 सकाळी 10.00 छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून प्रभाग 5 परिसरात होणार आहे. तरी पक्षाच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी समर्थक यांनी याबद्दल या पदयात्रेत सहभागी होऊन उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करावे असे आव्हान युवा नेते सुशील सरवदे यांनी केले आहे.
