• Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
Saturday, March 28, 2026
  • Login
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
lokpravah.in
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

धाराशिवचा राज जाधव, सांगलीची सानिका चाफे महाराष्ट्राचे खो-खो कर्णधार

Lok Pravah by Lok Pravah
December 9, 2025
in क्रीडा, राज्य
0
धाराशिवचा राज जाधव, सांगलीची सानिका चाफे महाराष्ट्राचे खो-खो कर्णधार
0
SHARES
0
VIEWS

अहिल्यानगर दि. ९ : राज्य अजिंक्यपद स्पर्धेतील तेजस्वी कामगिरीच्या बळावर धाराशिवचा राज जाधव व सांगलीची सानिका चाफे यांची अनुक्रमे कुमार व मुली गटाच्या महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. येत्या ३१ डिसेंबर २०२५ ते ४ जानेवारी २०२६ या कालावधीत बंगळुरू, कर्नाटक येथे होणाऱ्या ४४व्या कुमार-मुली राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत हे दोन्ही संघ महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

ही निवड अहिल्यानगर येथे पार पडलेल्या ५१ वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेतून झालेल्या उत्तम कामगिरीचा परिणाम आहे. निवड समिती सदस्य श्रीनिवास मेतरी (रायगड), मनोज परदेशी (नंदुरबार), योगेश सोळसे (बीड) व राखी जोशी (पुणे) यांच्या उपस्थितीत निवड झालेल्या संघाची घोषणा महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांनी केली.

स्पर्धापूर्व प्रशिक्षण – उच्च दर्जाची तयारी सुरूराष्ट्रीय पातळीवरील कठोर स्पर्धेचा विचार करून कुमार गटाचे शिबिर २२ ते २९ डिसेंबर सोलापूर येथे तर मुली गटाचे शिबिर धाराशिव येथे आयोजित करण्यात येणार आहे. या दोन्ही शिबिरातून संघाची रणनीती, फिटनेस व मनोधैर्य दृढ करण्यात येणार आहे.

महाराष्ट्राच्या संघातील खेळाडू : कुमार गट : राज जाधव – कर्णधार, जितेंद्र वसावे, हाराद्या वसावे, सोत्या वळवी, विशाल वसावे (सर्व धाराशिव), शंभूराज चंदनशिव, अरमान शेख, सिद्धार्थ माने-देशमुख (सर्व सोलापूर), श्री दळवी, पार्थ देवकाते (सर्व सांगली), श्री वसावे, आदेश पाटील (सर्व पुणे), तरबेज खान (सातारा), आशिष गौतम (ठाणे), ओमकार चव्हाण (अहिल्यानगर), राखीव : शंकर यादव (पुणे), समर्थ सावंत (मुं. उपनगर), लोकेश जाधव (सातारा), प्रशिक्षक : मोहन राजपूत (सोलापूर), सहा. प्रशिक्षक : सुजित माळी (लातूर), व्यवस्थापक : गणेश वारुळे (अहिल्यानगर)

मुली गट : सानिका चाफे – कर्णधार, श्रावणी तामखडे, विद्या तामखडे, सानिया सुतार (सर्व सांगली), धनश्री कंक, प्रणिती जगदाळे, दिक्षा काटेकर, श्रुती चोरमारे (सर्व ठाणे), मैथिली पवार, राही पाटील (सर्व धाराशिव), स्नेहा लामकाणे, प्राजक्ता बनसोडे (सर्व सोलापूर), निलम मोहंडकर (नाशिक), श्वेता नवले (पुणे), दिव्या पायले (रत्नागिरी), राखीव : कल्याणी लामकाणे (सोलापूर), सखुबाई चव्हाण (पुणे), सलोनी भोसले (सातारा), प्रशिक्षक : अभिजित पाटील (धाराशिव), सहा. प्रशिक्षक : ऐश्वर्या सावंत (रत्नागिरी), व्यवस्थापिका : उज्वला चेमटे (अहिल्यानगर)

राज जाधव आणि सानिका चाफे यांची कर्णधारपदी निवड ही खेळाडूंच्या जिद्दीचा, सातत्याच्या मेहनतीचा आणि मजबूत प्रशिक्षण संस्कृतीचा विजय आहे.

१४ वर्षाखालील (सब ज्युनिअर) गटातील देशातील सर्वोत्कृष्ट खेळाडू साठीचा राज जाधव हा भरत पुरस्कार प्राप्त आहे तर सानिका चाफे ही इला पुरस्कार प्राप्त आहे. राज्यातील ग्रामीण-पट्ट्यातील खेळाडू राष्ट्रीय पातळीवर आपले नाव सोन्याच्या अक्षरांत लिहू लागले आहेत, ही महाराष्ट्र खो-खोच्या सुवर्णयुगाची चाहूल आहे. बंगळुरूमधील राष्ट्रीय स्पर्धा त्यांची खरी कसोटी, आणि महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेची शान वाढविण्याची संधी ठरणार आहे.

Tags: dharashivKho khomaharashtraraj jadhavsanglisanika chafesports

Recent Posts

  • कवठ्यात विकासाचा जागर : त्रिशिव हनुमान मंदिर सभागृहाचे भूमीपूजन; महिलांना शिलाई मशीन वाटप
  • सम्राट चौकात पाइपलाइन लिकेज; खड्डे व पाणी साचल्याने नागरिकांच्या जीवितास धोका
  • घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी पंढरपूरमध्ये धाड; एका विरुद्ध गुन्हा दाखल
  • एपस्टीन फाईल प्रकरण : वंचित बहुजन आघाडी 16 मार्चला करणार आंदोलन
  • 𝐆𝐌 संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अध्यक्षपदी अभी क्षिरसागर

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Top News
  • Uncategorized
  • अर्थकारण
  • कविता
  • क्रीडा
  • जाहिरात
  • जिल्हा
  • तालुका
  • देश
  • मनोरंजन
  • माझ सोलापूर
  • राजकारण
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • शहर
  • Home

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

© 2025