सोलापूर दि.24 : सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने नामनिर्देशन अर्ज विक्री व स्वीकारण्याची प्रक्रिया सोलापूर महानगरपालिका प्रशासनामार्फत राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आज दि. 24 ला 1035 नामनिर्देशन अर्ज विक्री करण्यात आली. निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे.
आज दिनांक २४-१२-२०२५ रोजी नामनिर्देशन अर्ज विक्री करण्यात आली. तपशील पुढीलप्रमाणे आहे : निवडणूक निर्णय अधिकारी -१ : १७३निवडणूक निर्णय अधिकारी -२:१४८. निवडणूक निर्णय अधिकारी-३ : १३१. निवडणूक निर्णय अधिकारी ४ : १४२. निवडणूक निर्णय अधिकारी-५ : १८४. निवडणूक निर्णय अधिकारी-६ : ९०. निवडणूक निर्णय अधिकारी-७ : १६७. आज एकूण १०३५ नामनिर्देशन अर्जांची विक्री झालेली आहे.
