• Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
Monday, March 30, 2026
  • Login
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
lokpravah.in
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

राष्ट्रीय खो-खो स्पर्धा : महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी मुंबई उपनगरचा निहार दुबळे व पुण्याची रितिका राठोड

Lok Pravah by Lok Pravah
January 10, 2026
in Top News, क्रीडा, देश
0
राष्ट्रीय खो-खो स्पर्धा : महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी मुंबई उपनगरचा निहार दुबळे व पुण्याची रितिका राठोड
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि. 10 : अस्सल मराठी मातीतील खेळ असलेल्या खो-खोचा रणसंग्राम आता तेलंगणाच्या भूमीत पेटणार असून महाराष्ट्राची फौज जेतेपदाचा झेंडा रोवण्यासाठी सज्ज झाली आहे. काजीपेठ (तेलंगणा) येथील रेल्वे ग्राउंडवर ११ ते १५ जानेवारी, २०२६ दरम्यान होणाऱ्या ५८ व्या पुरुष व महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनने आपले पुरुष व महिला संघ जाहीर केले आहेत.

हे संघ सहभागापुरते नसून जेतेपदावर दरारा निर्माण करण्याच्या निर्धाराने मैदानात उतरले आहेत.प्रशिक्षण शिबिरातून आत्मविश्वासाचा नवा जोशस्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबिर बीड येथील राजश्री शाहू कन्या शाळेच्या मैदानावर यशस्वीरीत्या पार पडले. शिबिराचा समारोप महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे माजी सरचिटणीस प्रा. जनार्दन शेळके व सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. दोन्ही संघ सुवर्णपदक जिंकतील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर महाराष्ट्राचे दोन्ही संघ काजीपेठ, तेलंगणा येथे रवाना झाले.गटवारीचा थरार : ‘अ’ आणि ‘ब’ गटात महाराष्ट्र सज्जभारतीय खो-खो महासंघाच्या गटवारीनुसार पुरुष संघ ‘ब’ गटात असून उत्तर प्रदेश, मणिपूर, जम्मू–काश्मीर व मेघालय यांच्याशी लढत देणार आहे. महिला संघ ‘अ’ गटात असून उत्तर प्रदेश, छत्तीसगड, अरुणाचल प्रदेश व चंदीगड ही आव्हाने असतील. दोन्ही गटांत फेव्हरेट म्हणून महाराष्ट्र आपली ताकद दाखवणार आहे.पुरुष संघ : अनुभव, वेग आणि आक्रमणाची संगतकर्णधार : निहार दुबळे (मुंबई उपनगर) यांच्या नेतृत्वाखाली पुरुष संघात अनुभवाची भक्कम फळी आहे. संघात शुभम थोरात, प्रतिक वाईकर, सुयश गरगटे, रुद्र थोपटे (सर्व पुणे), अनिकेत चेंदवणकर, निहार दुबळे (कर्णधार), प्रतिक देवरे, ऋषिकेश मुर्चावडे (सर्व मुंबई उपनगर), विजय शिंदे, सचिन पवार (सर्व धाराशिव), अक्षय मासाळ, अभिषेक केरीपाळे (सर्व सांगली), शुभम उतेकर (ठाणे), वेदांत देसाई (मुंबई), तुकाराम कारंडे (बीड) यांचा समावेश आहे. प्रशिक्षक : डॉ. नरेंद्र कुंदर (मुंबई उपनगर), सहाय्यक प्रशिक्षक : अजित शिंदे (सोलापूर), व्यवस्थापक : प्रफुल हाटवटे (बीड) अशी मार्गदर्शक फळी आहे.महिला संघ : रणरागिणींचा आत्मविश्वास आणि धारकर्णधार : रितिका राठोड (पुणे) यांच्या नेतृत्वाखाली महिला संघात धाराशिवचे वर्चस्व दिसून येते. संघात अश्विनी शिंदे, संध्या सुरवसे, सुहानी धोत्रे, संपदा मोरे, मैथिली पवार, तन्वी भोसले (सर्व धाराशिव), प्रियांका इंगळे, कोमल दारवटकर, श्वेता नवले, रितिका राठोड (कर्णधार) (सर्व पुणे), रेश्मा राठोड, पूजा फरगडे (सर्व ठाणे), सरिता दिवा (नाशिक), प्रतिक्षा बिराजदार (सांगली), पायल पवार (रत्नागिरी) या रणरागिणी मैदानात उतरतील. प्रशिक्षक : नरेंद्र मेंगळ (ठाणे), सहाय्यक प्रशिक्षक : निकिता पवार (धाराशिव), व्यवस्थापिका : सुनिता जायभाय (बीड) यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.मार्गदर्शकांचे बळ, व्यवस्थापनाची ठाम साथदोन्ही संघांसोबत अनुभवी प्रशिक्षक, सहाय्यक प्रशिक्षक व व्यवस्थापनाची मजबूत टीम असल्याने तांत्रिक तयारी, डावपेच आणि मानसिक बळ या तिन्ही आघाड्यांवर महाराष्ट्र सज्ज आहे.शुभेच्छांचा वर्षाव : सुवर्णमय स्वप्नासाठी एकजूटमहाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष मा. ना. श्री. अजित पवार, कार्याध्यक्ष श्री. सचिन गोडबोले, सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव व खजिनदार अॅड. गोविंद शर्मा यांनी खेळाडूंना सुवर्णमय यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.तेलंगणाच्या भूमीत महाराष्ट्राचे वादळ घोंघावणार—जेतेपदाचा निर्धार, मैदानावरचा वेग आणि संघभावना यांची दमदार परीक्षा आता सुरू!

Tags: #khokho#lokpravah#lokpravahmedia#lokpravahnews#mumbi#nationalcampionship#ritikarathore#sports#telanganacaptainnihar dublepune

Recent Posts

  • राज्यस्तरीय शालेय ‘तेंग सू डो’ क्रीडा स्पर्धेत उमरग्याचा डंका; २३ पदकांसह कोरले नाव
  • कवठ्यात विकासाचा जागर : त्रिशिव हनुमान मंदिर सभागृहाचे भूमीपूजन; महिलांना शिलाई मशीन वाटप
  • सम्राट चौकात पाइपलाइन लिकेज; खड्डे व पाणी साचल्याने नागरिकांच्या जीवितास धोका
  • घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी पंढरपूरमध्ये धाड; एका विरुद्ध गुन्हा दाखल
  • एपस्टीन फाईल प्रकरण : वंचित बहुजन आघाडी 16 मार्चला करणार आंदोलन

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Top News
  • Uncategorized
  • अर्थकारण
  • कविता
  • क्रीडा
  • जाहिरात
  • जिल्हा
  • तालुका
  • देश
  • मनोरंजन
  • माझ सोलापूर
  • राजकारण
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • शहर
  • Home

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

© 2025