सोलापूर, ०६ : भारतातील सामाजिक न्याय, समता आणि प्रबोधनाचा दीप प्रज्वलित करणारे परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी आंबेडकर चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

डॉ. आंबेडकरांनी भारतीय समाजातील अंधकारमय विषमता दूर करून ज्ञान, स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेची दिशा दाखवली. भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून त्यांनी दिलेला लोकशाहीचा मार्ग आजही विश्वासाठी प्रेरणादायी आहे. पीडित, शोषित आणि वंचित समाजाला त्यांनी दिलेली नवी ओळख आणि आत्मसन्मान ही त्यांच्या कार्याची अजरामर देणगी आहे.

या अभिवादन कार्यक्रमास शहर काँग्रेस अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, नगरसेवक विनोद भोसले, महिला अध्यक्षा प्रमिलाताई तूपलवंडे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, ब्लॉक अध्यक्ष देविदास गायकवाड, मीडिया सेल अध्यक्ष तिरुपती परकीपडंला, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, वक्ता सेल अध्यक्ष नागनाथ कदम, भटक्या विमुक्त अध्यक्ष युवराज जाधव, कामगार सेल अध्यक्ष सायमन गट्टू, रोजगार व स्वयंरोजगार सेल अध्यक्ष राजेंद्र शिरकुल, शहर मध्य युवक काँग्रेस अध्यक्ष वाहिद बिजापुरे, उत्तर युवक काँग्रेस अध्यक्ष महेश लोंढे, सरचिटणीस केशव इंगळे, रॉकी बंगाळे, माजी नगरसेवक प्रा. भोजराज पवार, सुभाष चव्हाण, मधुकर अठवले, उपाध्यक्ष अंबादास गुत्तीकोंडा, बसवराज म्हेत्रे, अनिल मस्के, कुमार बंटी, चंदनशिवे, सागर शहा, लखन गायकवाड, संजय गायकवाड, सागर उबाळे, माया कांबळे, नूरअहमद नालवार, आप्पा सलगर, भीमराव शिंदे, सुभाष वाघमारे, ज्ञानेश्वर जाधव, शोभा बोबे, शुभांगी लिंगराज, रुकीयाबानो बिराजदार, ज्योती गायकवाड, सलीमा शेख, अनिता भालेराव, संतोष सोनवणे, डॉ. प्रकाश माने, रवी बनसोडे, अभिषेक पाटोळे, प्रवीण देडे, पृथ्वीराज लोंढे, नागनाथ शावणे, इम्तियाज यादगिर, चंदू नाईक, रतन डोळसे, अभिलाष अच्युगटला, रुबीन डेव्हिड, आदी शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीतील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

