• Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
Saturday, March 28, 2026
  • Login
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
lokpravah.in
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे : खासदार प्रणिती शिंदे

Lok Pravah by Lok Pravah
January 4, 2026
in Top News, जिल्हा, तालुका, माझ सोलापूर, राज्य, शहर
0
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे : खासदार प्रणिती शिंदे
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर दि.०३ :सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी अधिक जोमाने, एकजुटीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने कामाला लागावे, असे आवाहन खासदार प्रणिती शिंदे यांनी केले.

सोलापूर शहर काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सोलापूर महानगरपालिका निवडणूक व्यवस्थापन समितीच्या सदस्यांची महत्त्वपूर्ण बैठक जनवास्तल्य कार्यालय, सात रस्ता येथे आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीला माजी आमदार प्रकाश यलगुलवार, माजी महापौर सुशीलाताई आबुटे, काँग्रेसचे प्रा. प्रवक्ते अशोक निंबर्गी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, सोलापूरच्या विकासासाठी आणि शहरातील नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी ही निवडणूक अत्यंत निर्णायक आहे. काँग्रेस, महाविकास आघाडी आणि सर्व सहकाऱ्यांच्या एकजुटीच्या बळावर ही लढाई आपण निश्चितपणे जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

काँग्रेसचा विचार, विकासकामे, तळागाळातील शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचवणे ही प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे. सोलापूर महानगरपालिकेवर काँग्रेस महाविकास आघाडीचा झेंडा फडकवण्यासाठी आतापासूनच जोमाने कामाला लागा. बुथ कमिट्या सक्षम करा. समोर कितीही ताकदीचा उमेदवार असला, तरी जनतेच्या विश्वासामुळे आणि पाठिंब्यामुळे आपला विजय निश्चित आहे, असे त्या म्हणाल्या.

ही निवडणूक केवळ सत्तेसाठी नसून विकासासाठी आहे, हे स्पष्ट करताना खासदार शिंदे यांनी सांगितले की, सोलापूरकरांना पाणी, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, शहराचा विकास यासह सर्व मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचा काँग्रेस महाविकास आघाडीचा ठाम संकल्प आहे. काँग्रेस महाविकास आघाडी सोलापूरकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून, सोलापूरकरांनीही या आघाडीला आपला आशीर्वाद द्यावा, असे त्यांनी आवाहन केले.

भाजप, महायुतीच्या सत्ताकाळातील भ्रष्टाचार, सत्तेचा माज व अहंकार, राजकीय फायद्यासाठी झालेली हत्या, दडपशाही, गुंडगिरी, एबी फॉर्मचा घोळ, पैशांची उधळण आणि प्रशासनाचा गैरवापर यामुळे सोलापूरचा विकास कसा थांबला, हे कार्यकर्त्यांनी थेट लोकांपर्यंत पोहोचवावे, असे निर्देश त्यांनी दिले.पाणीटंचाई, खराब रस्ते, कचऱ्याची समस्या तसेच स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहराची झालेली दुर्दशा याबाबत जनजागृती करण्याचेही त्यांनी आवाहन केले.

लोकांचा कल काँग्रेस महाविकास आघाडीच्या बाजूने असल्याचे स्पष्ट असून, प्रत्येक कार्यकर्त्याने जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचणे गरजेचे आहे. प्रत्येक प्रभागातील उमेदवारांना संघटितपणे मदत करा. लोकशाही मार्गाने, कोणत्याही दडपशाहीला बळी न पडता परिवर्तन घडवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निर्धाराने मैदानात उतरावे, असे आवाहन खासदार प्रणिती शिंदे यांनी शेवटी केले.

काँग्रेस सोलापूरकरांच्या हितासाठी वचनबद्ध असून, सोलापूर घडवण्यासाठी काँग्रेस महाविकास आघाडी कटिबद्ध आहे, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Tags: candidatescongressdr babasheb ambedkarElectionlokpravahlokpravahmedialokpravahnewsmp praniti shindeMunicipal corporationpracharpublic meetingsolapur

Recent Posts

  • कवठ्यात विकासाचा जागर : त्रिशिव हनुमान मंदिर सभागृहाचे भूमीपूजन; महिलांना शिलाई मशीन वाटप
  • सम्राट चौकात पाइपलाइन लिकेज; खड्डे व पाणी साचल्याने नागरिकांच्या जीवितास धोका
  • घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी पंढरपूरमध्ये धाड; एका विरुद्ध गुन्हा दाखल
  • एपस्टीन फाईल प्रकरण : वंचित बहुजन आघाडी 16 मार्चला करणार आंदोलन
  • 𝐆𝐌 संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अध्यक्षपदी अभी क्षिरसागर

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Top News
  • Uncategorized
  • अर्थकारण
  • कविता
  • क्रीडा
  • जाहिरात
  • जिल्हा
  • तालुका
  • देश
  • मनोरंजन
  • माझ सोलापूर
  • राजकारण
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • शहर
  • Home

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

© 2025