पुणे दि. 28 : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबईवरून बारामतीला विमानाने येत असताना बारामती जवळील गोजिबो या गावाजवळ झालेल्या विमान अपघातामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला.

त्या विमाना अपघातात अजित पवारांसोबत कॅप्टन सुमित कपूर , कॅप्टन शांभवी पाठक, विदिप जाधव, पिंकी माळी यांचा मृत्यू झाला.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या कार्यशैली साठी महाराष्ट्राला परिचित होते. त्यांचा दिनक्रम हा सकाळी लवकर सुरू होत असून आज ही नेहमीप्रमाणे सकाळी त्यांचा दिनक्रम सुरू झाला .आणि मुंबईवरून ते बारामती येथील आपल्या दिवसभरातील तीन सभा घेण्यासाठी विमानाने येत होते.

*खाजगी VSR कंपनीचे विमान*
एकूण प्रवासी 051. अजित दादा पवार 2. मुंबई पीएसओ HC विदीप जाधव 3. पायलट कॅप्टन सुमित कपूर 4. कॅप्टन संभवी पाठक 5. पिंकी माळी, फ्लाईट अटेंडंट मुंबई टेक ऑफ टाइमिंग सकाळी 08.10 hrs बारामती लँडिंग 08.50 hrs
