मतमोजणी प्रभागनिहाय ठिकाण

*सोलापूर महानगरपालिका निवडणूक : दुपारी ३.३० वाजेपर्यंत ४०.३९ % मतदान*
प्रभाग 8 मध्ये भाजप उमेदवारांनी फटाके फोडले
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६दिनांक १५ जानेवारी २०२६सकाळी १.३० वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी : ३०. २२ %
सैफुल येथील महाविद्यालय साडेपाच नंतर मतदान केंद्र बंद करण्यात आले.

अडीच वाजेपर्यंत प्रभाग क्रमांक 3 मधील जय भवानी कन्नड शाळेत जवळपास 35- 40% पर्यंत मतदान झाले आहे 31.22 टक्के
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ मतदानाचा हक्क बजाविल्यानंतर सुधीर खरटमल, हर्षल खरटमल, नेहा खरटमल व प्रचेत खरटमल आदी.

नियमित जी शाई वापरली जाते तीच शाई वापरली जात आहे, त्यात कोणताही दुसरा घटक नाहीय. मार्कर पेनच्या स्वरुपात राज्य निवडणूक आयोग २०११ पासून ही शाई वापरत आहे. ही शाई लावल्यानंतर त्याला सुकण्याकरता १० ते १२ सेकंद लागतात. हे १०-१२ सेकंद मतदार मतदान केंद्रातच असतो. ड्राय झाल्यानंतर ही शाई काढता येत नाही. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जी शाई वापरतेय तीच ही शाई आहे. जर दुबार मतदान झाले तर मतदान केंद्राच्या अध्यक्षावर कारवाई होणार असं राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले..

प्रभाग क्रमांक १ चे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रवींद्र बॉस गायकवाड व महिला आघाडीच्या नेत्या मंदाकिनी शिंगे व हेमा वाघमारे व कार्यकर्ते आणि फुले आंबेडकर विद्वत सभेचे माजी अध्यक्ष श्याम शिंगे यांनी मतदान करून आल्यानंतर चा एक क्षण

शरद पवार शाळेजवळ स्वतः पोलीस आयुक्त रस्त्यावर उतरले आहेत, वातावरण तणावपूर्ण आहे प्रभाग 7
लोकप्रवाह मीडियाचे संपादक सचिन गायकवाड व पत्नी अंजली गायकवाड यांनी प्रभाग एक व प्रभाग चार मध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला व सोलापूरकर जनतेनेही आपले मतदान बजावून लोकशाही बळकट करावी असे आवाहन केले

चौपाड नऊ नंबर शाळा तसेच…रावजी सखाराम प्रशाला पोलीस फोर्स येऊन गर्दी पांगवली.

अनेक मतदान केंद्रांवर मतदान यंत्रांचा सिक्वेन्स चुकीच्या पद्धतीने मांडून ठेवण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक 20 मध्ये युगंधर हॉस्पिटल येथे हा प्रकार निदर्शनास आणून देण्यात आल्यानंतर रिसायडिंग ऑफिसर यांनी तो बदलला आहे.( अ ब क ड या ऐवजी पहिला ड दुसरा ब तिसरा क आणि चौथा अ असे ठेवण्यात आले आहे)

प्रभाग क्रमांक 18 मध्ये तणाव भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आणि माकप उमेदवार यांच्यात गोंधळ. एमआयडीसी पोलीस घटनास्थळी
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६दिनांक १५ जानेवारी २०२६सकाळी ११.३० वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी : १८.०८ टक्के
नूतन प्रशाला

महापालिकेने निवडणुकीत मतदानासाठी कुटुंबाचे केले विभाजन.. मतदानासाठी नवरा इकडे.. बायको तिकडे मुलं तिसरीकडे

प्रभाग क्रमांक दोन मधील अनेक नव मतदारांची नांवे प्रभाग क्रमांक एक मध्ये गेली
अनेक मतदान केंद्रांवर मतदान यंत्रांचा सिक्वेन्स चुकीच्या पद्धतीने मांडून ठेवण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक 20 मध्ये युगंधर हॉस्पिटल येथे हा प्रकार निदर्शनास आणून देण्यात आल्यानंतर रिसायडिंग ऑफिसर यांनी तो बदलला आहे.( अ ब क ड या ऐवजी पहिला ड दुसरा ब तिसरा क आणि चौथा अ असे ठेवण्यात आले आहे)
शरदचंद्र पवार प्रशाला येथे पालिका आयुक्त भेट



शिवसेनेचे माजी नगरसेवक राजकुमार हंचाटे यांनी प्रभाग ११ मध्ये रोशन प्रशालेत बजावला मतदानाचा हक्क

प्रतापनगर येथील मतदान केंद्राबाहेर अशी गर्दी होती

बाळे : कासीमसाब शेख – ( वय ८० ) मतदान केंद्रावर मतदान करण्या साठी आले

आमदार विजयकुमार देशमुख यांनी केले मतदान

पाच तास होत आले पण मतदानाची टक्केवारी १० टक्क्यांपर्यंत आहे, अशी स्थिती आहे. अजूनही बहुतेक मतदान केंद्रांवर फक्त दोन – चार मतदार दिसत आहेत.
प्रभाग क्रमांक ५ बाळे चंडक प्रशालेच्या २१ नंबर केंद्रावर मंगल वसंत वाघमारे यांच्या नावावर दुसऱ्याचे मतदान

अनेक मतदान केंद्रावर 100 मीटरच्या आत उमेदवार प्रचार करताना दिसत आहेत.
महात्मा बसवेश्वर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मतदान केंद्र

सोलापूर दि. 15 : लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सव आज सकाळी सुरू झाला आहे. शहरातील मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. स्थानिक मतदान केंद्रावर जाऊन सर्व मतदार आपले मत नोंदवत आहेत.
पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी बजावला मतदानाचा हक्क

प्रभाग 3 मधिल 5 नंबर मशीन बंद पडल्याची माहिती
आमदार सुभाष देशमुख यांनी कुटुंबासह केले मतदान

प्रभात एक महिला मतदार

आनंद चंदनशिवे यांनी केले मतदान

प्रभाग क्रमांक चार येथे श्राविका शाळेसमोर दोन गटात मोठा गोंधळ
धरमशी लाईन येथील मतदार बंधू भगिनींनी मतदान केल्यानंतर दिलेली पोझ


प्रभाग २६ मध्ये उमेदवारांच्या आरक्षणाचे प्रवर्ग मतदान यंत्रावर बदल करण्यात आल्याने उमेदवारामधून तीव्र संताप
प्रिसिजन कॅमशॉफ्टचे चेअरमन यतिन शहा, प्रिसिजन फाउंडेशच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा व प्रिसिजनचे संचालक करण शहा यांनी लिटल फ्लॉवर इंग्लिश मिडियम स्कूल. बुथ क्र. २६ इथे मतदानाचा हक्क बजावला.

सकाळपासून जवळपास दहा मतदान केंद्रांवर मत मशीन बंद पडल्याच्या तक्रारी आल्या होत्या . किमान अर्धा ते एक तास अनेक ठिकाणी विलंब झाला आहे
बाळे मतदान केंद्रावरील मतदाराच्या रांगा




मतदान केंद्रावरील कर्मचारी मतदारांना बुथ क्रमांक शोधून देतात

7
