
सोलापूर भाजप एबी फॉर्म गोंधळ ; निवडणूक निर्णय अधिकारी 4 यांचे स्पष्टीकरण ; पत्र सोशल मीडियावर व्हायरल

आयुक्तांना निवेदन देताना अमोल शिंदे चेतन नरोटे व सर्व पदाधिकारी


AB फॉर्म प्रकरण, पालिका आयुक्तांना निवेदन देण्यासाठी सर्व एकवटले

सोलापूर महानगरपालिकेसाठी भाजपने सर्व जागांवर म्हणजे १०२ उमेदवार मैदानात उतरवले आहेत. कोणाला तिकीट मिळालं. याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. प्रभाग १ मधून गौतम कसबे, राजश्री कणके, अविनाश पाटील, काशीद. प्रभाग २ मधून डॉ. किरण देशमुख, कल्पना कारभारी, प्रा. नारायण बनसोडे, शालन शिंदे प्रभाग ३ मधून राजू पाटील, संजय कोळी, सौ. बडगू, रंजिता चाकोते प्रभाग ४ मधून अनंत जाधव, विनायक विटकर, वंदना गायकवाड, राजश्री साखरे, प्रभाग ५ – बिज्जू प्रधाने, मंदाकिनी तोडकरी, स्वाती आयवळे, सुरवसे प्रभाग ६ मधून गणेश वानकर, खटके यांना उमेदवारी मिळाल्याची माहिती मिळत आहे.
प्रभाग 21 मधून भारतीय जनता पार्टी कडून सात्विक प्रशांत बडवे यांचा अर्ज वैध

प्रभाग 14 ड मधून सलाउद्दीन शेख, रियाज खरादी,कलीम तुलजापुर, तौफीक हत्तुरे, व इतर सर्व १४ अर्ज वैध.

इरफान शेख यांनी महिला प्रवर्गमधून अर्ज भरला म्हणून तो बाद झाला.
एमआयएम, राष्ट्रवादीला धक्का ; राष्ट्रवादीचे विवेक खरटमल, इरफान शेख,एमआयएमचे नागेश कांबळे यांचा अर्ज बाद
भाजपाच्या वतीने आपल्याला उमेदवारी निश्चित झाली आहे ए बी फॉर्म मिळाला असं किसन जाधव यांची प्रतिक्रिया आहे. आज छाननी मध्ये आपला उमेदवारी अर्ज वैद्य झाला आहे – किसन जाधव

प्रभाग 1अ मधून – गौतम कसबे यांचा उमेदवारी अर्ज मंजूर भारतीय जनता पार्टीच्या एबी फॉर्म सहित.

सोलापूर दि. 31 : सोलापूर महापालिका निवडणूक कार्यालयाजवळ कडक सुरक्षा व्यवस्था, वकिलांची लक्षणीय उपस्थिती आहे. सोलापूर महानगरपालिका निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर आज महापालिका निवडणूक कार्यालय परिसरात पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर दिसून आले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

निवडणूक अर्जांची छाननी व त्यासंदर्भातील तक्रारी, हरकती यामुळे कार्यालय परिसरात वकिलांची लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळाली. कायदेशीर बाबींवर चर्चा, सल्लामसलत तसेच अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करण्यासाठी वकिलांची गर्दी झाल्याने परिसरात हालचाली वाढल्या होत्या.दरम्यान, शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून सतत नजर ठेवण्यात येत असून परिस्थिती पूर्णतः नियंत्रणात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

सोलापूर महानगरपालिका निवडणूक 2025-26 च्या नामांकन अर्ज भरल्यानंतर उमेदवारांच्या अर्जाची छाननी आज नॉर्थ कोट प्रशाला येथे होणार आहे. यासाठी सर्वपक्षीय उमेदवार नॉर्थकोर्ट प्रशाला येथे उपस्थित राहत आहेत.

नॉर्थकोट प्रशालेच्या गेटवर वकिलांना अडवले मोठा वाद सुरू. शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांची व पोलिसांची बाचाबाची सुरू आहे. उमेदवारांच्या वकिलांना आत मध्ये प्रवेश द्या, आमच्या उमेदवारीचा प्रश्न आहे असे अमोल शिंदे म्हणाले.
