सोलापूर दि. 7: भवानी पेठ प्रभाग ३ मध्ये भाजपाने निर्माण केलेली मक्तेदारी जनविकास क्रांतीसेनेचे उमेदवार किरण शिरसागर निवडणूक जिंकून मक्तेदारी संपविणार असा निर्धार अध्यक्ष विष्णू कारमपुरी (महाराज) यांनी प्रभाग ३ मधील अधिकृत व संयुक्त विकास आघाडीचे उमेदवार किरण शिरसागर यांच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
संयुक्त विकास आघाडीचे जनविकास क्रांतीचे अधिकृत उमेदवार किरण शिरसागर यांच्या प्रचारार्थ प्रभाग तीन मधील मातंग वस्ती येथील, श्री मातंगेश्वरी देवीचे पूजन करण्यात आले.
यावेळी जनशक्ती काँग्रेस पक्षाचे विक्रम कसबे, आरपीआय डेमोक्रॅटिक पक्षाचे बाळासाहेब गायकवाड, उमेदवार किरण शिरसागर, जनविकास क्रांती सेनेचे सदस्य रेखा आडकी, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्रचाराचा शुभारंभ केल्यानंतर प्रभाग ३ मधील मतदार बंधू भगिनींच्या घरोघरी जाऊन कपबशी या चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन केले.
यावेळी मतदार बंधू भगिनींकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. प्रचाराच्या उद्घाटन प्रसंगी गुरुनाथ कोळी, संतोष जाधव,श्रीनिवास बोगा, प्रसाद जगताप,राजू क्षीरसागर,दीपक बोमणे, राम कांबळे, राणी शिरसागर, सुरेखा बोमणे, मीना कुडे,आदि उपस्थित होते.
