सोलापूर : जिल्ह्यातील वडापूर (ता. दक्षिण सोलापूर) गावात अनैतिक संबंधांना विरोध केल्याच्या रागातून पतीने पत्नीची कोयत्याने गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. सविता जकप्पा पुजारी (वय 35) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून आरोपी पतीचे नाव जकप्पा मणगेरी पुजारी असल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जकप्पा पुजारी यांचे कर्नाटकातील विजयपूर येथील एका महिलेशी अनैतिक संबंध होते. या प्रकाराला सविता पुजारी सातत्याने विरोध करत होती. त्यामुळे पती-पत्नीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सतत वाद सुरू होते.मंगळवारी पुन्हा एकदा दोघांमध्ये तीव्र भांडण झाले. आपल्या विवाहबाह्य संबंधांना विरोध का करते असा सवाल जकप्पाने केला. भांडण जास्त वाढल्यानंतर रागाच्या भरात जकप्पा पुजार्याने कोयता उचलत सविता यांच्या डोक्यावर व गळ्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात सविता घटनास्थळी कोसळून मृत्यूमुखी पडली.
