• Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
Saturday, March 28, 2026
  • Login
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
lokpravah.in
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

प्रभाग ६ मध्ये विकासाची गंगा आणणार ! पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा वानकर परिवाराला हजारोंच्या साक्षीने शब्द !

Lok Pravah by Lok Pravah
January 5, 2026
in Top News, तालुका, माझ सोलापूर, राजकारण, शहर
0
प्रभाग ६ मध्ये विकासाची गंगा आणणार  ! पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा वानकर परिवाराला हजारोंच्या साक्षीने शब्द !
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर दि. 5 : केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकासाची कामे झाली आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे लाडक्या बहिणी खुश आहेत. सोलापूर महानगरपालिकेतसुद्धा भाजपाची सत्ता येणार असून प्रभाग क्रमांक ६ मध्ये विकासाची गंगा आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचा शब्द पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी हजारोंच्या साक्षीने वानकर परिवाराला दिला.

देगावमध्ये झालेल्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी होती. लाडक्या बहिणींच्या गर्दीने सभामंडप ओसंडून वाहत होता. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग ६ मधील भाजपच्या उमेदवार सोनाली गायकवाड, सुनील खटके, मृण्मयी गवळी आणि गणेश वानकर यांच्या निवडणुक प्रचाराचा सोलापुरातील पहिला शुभारंभ रविवारी सकाळी देगाव ग्रामपंचायत येथील जागृत मारुती मंदिरात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला.

यानंतर झालेल्या विराट सभेत पालकमंत्री गोरे यांनी प्रभागातील नागरिकांना आश्वासित केले. प्रभागाच्या विकासाची काळजी आपली असून आपण सर्व उमेदवारांना सर्वाधिक मताधिक्यांनी निवडून आणण्यासाठी कामाला लागा,असे आवाहनही पालकमंत्री गोरे यांनी यावेळी बोलताना केले.

याप्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार दिलीप माने, भाजप शहराध्यक्ष रोहिणी तळवळकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण,भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष मनिष देशमुख, ज्येष्ठ नेते प्रकाश वानकर,प्रचार प्रमुख हेमंत पिंगळे उपस्थित होते.

पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे सभेच्या ठिकाणी आगमन होताच जय श्रीराम, वंदे मातरमच्या घोषणांनाही परिसर दणाणून गेला.

पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले वानकर परिवाराने सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेची पताका मोठ्या ताकतीने फडकविण्याचे काम निष्ठेने पार पाडले. त्यानंतर वानकर परिवार भारतीय जनता पार्टीच्या प्रवाहात आला आहे महाराष्ट्र आणि देशाचा विकास फक्त भाजपच करू शकतो, या विचाराने वानकर परिवार भारतीय जनता पार्टीमध्ये आलेला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वानकर परिवाराला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश दिला आहे. त्यामुळे वानकर परिवाराला भारतीय जनता पार्टीने पूर्णपणे स्वीकारले आहे. सभामंडपातील गर्दी पाहिल्यानंतर प्रभाग क्रमांक ६ मधील चारही उमेदवार निवडून येणार आहेत हे आता ज्योतिषाला सुद्धा विचारण्याची गरज नाही. पूर्वी प्रभाग ६ मधून वानकर निवडून येईल असे लोक म्हणायचे. आता मात्र भाजप निवडून येईल असे लोक म्हणू लागले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून सोलापूरसाठी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून विकास करण्यात आला. विमानसेवा, आयटी पार्क झाले . दररोजच्या पाणीपुरवठ्याचा सुद्धा प्रश्न मिटला आहे. त्यामुळे आता वानकर परिवार भाजपमध्ये आल्यामुळे प्रभाग क्रमांक ६ मध्ये विकासगंगा आणण्याचा शब्द आपण सर्वांच्या साक्षीने देत आहोत.

कोणत्याही परिस्थितीत सोलापूर शहरामध्ये सर्वाधिक मताधिक्याने प्रभाग क्रमांक ६ मधील सर्व उमेदवार निवडून येतील ,असा विश्वास व्यक्त प्रभाग क्रमांक ६ मध्ये आज खऱ्या अर्थाने आपण भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचा नारळ फोडला आहे .

प्रभाग क्रमांक सहाचा हा प्रचार नव्हे तर विजयी सभा असल्याचेच पालकमंत्री गोरे यांनी यावेळी बोलताना सांगितले. भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर ,भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष मनीष देशमुख तसेच प्रचार प्रमुख हेमंत पिंगळे यांनीही यावेळी आपले विचार मांडले .

वानकर परिवारामुळे प्रभाग क्रमांक सहा मधील भारतीय जनता पक्षाला आणखी मोठे बळ आले असून सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला, ज्येष्ठ नेते प्रकाश वानकर यांनी मनोगत व्यक्त करताना शत ; प्रतिशत भाजपचा नारा दिला.

उमेदवार सुनील खटके आणि मृण्मयी गवळी यांनी प्रभागातील समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

याप्रसंगी भरत सुर्वे, सिद्धेश्वर कस्तुरे,माजी नगरसेविका मंगलताई वानकर ,सोमराज गायकवाड ,दत्तात्रय वानकर,विठ्ठल वानकर ,महादेव गवळी , किरण वाघमोडे ,लखन कारंडे ,यांच्यासह अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते

विरोधात राहून काम करता येत नाही ,म्हणून सोलापूर महानगरपालिका निवडणूक असो किंवा अन्य कोणत्याही निवडणुका असो गणेश वानकर आणि परिवाराने नेहमीच विकासाचे राजकारण केले आहे . गणेश वानकरांनी भाजपात येण्यासाठी यापूर्वीच विनंती करण्यात आली होती ,मात्र त्यांनी त्यावेळी प्रतिसाद दिला नाही.मात्र आज ते भाजपामध्ये आले आहेत. त्यांचे निश्चितच स्वागत आहे.

विरोधात राहून विकास कामे करता येत नाहीत याची त्यांना जाणीव असल्यामुळे त्यांनी सत्तेबरोबर म्हणजेच भाजपबरोबर राहण्याचा निर्णय घेतला आहे . दोघा आमदारांचा हा भाग असला तरी दमान नगर आणि परिसरात १०० टक्के विकासाची कामे झालेली आहेत . प्रभागाचा विकास हेच आता अंतिम ध्येय असल्याचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी यावेळी बोलताना सांगितले.

तिसरी पिढी राजकारणात : सोलापूरच्या राजकारणात अनेक वर्षे ज्येष्ठ नेते प्रकाश वानकर ,पत्नी व माजी नगरसेविका मंगलताई वानकर ,गणेश वानकर ,दत्तात्रय वानकर आणि विठ्ठल वानकर हे निष्ठेने काम करतच आहेत . परंतु आता त्यांच्या तिसऱ्या पिढीतील समर्थ ,विश्वजीत आणि अभय वानकर यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी सोबत जनसेवेसाठी कामाला सुरुवात केली. तिसऱ्या पिढीच्या या युवा नेत्यांचे सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.

यापुढे सर्व निवडणुका कमळ चिन्हावरच लढविणार : विरोधी पक्षात असताना सुद्धा विकासकामात कोणतीच कसर सोडली नाही. प्रभागाचा कमालीचा कायापालट करण्यात आपण यशस्वी झालो .

आमदार विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांच्या माध्यमातून विकासाची मोठी कामे झाली आहेत . माजी आमदार दिलीप माने यांनी सुद्धा निधी दिला. प्रभागाचा मोठा विकास करताना वाड्या वस्त्यांवरचा भाग असल्यामुळे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत . याच भागातून आदिला नदी वाहत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो . ओढ्यावर पूल नाही. त्यामुळे पालकमंत्र्यांनी या प्रभाकडे जातीने लक्ष घातल्यास विकासाला आणखी बळ मिळेल ,असे सांगतानाच वानकर परिवाराचा भाजपमधील प्रवेशाचा निर्णय जनतेला आवडला आहे.

ठाकरे परिवारासाठी जसे एकनिष्ठ राहिलो तसेच भाजपासुद्धा यापुढे सर्व निवडणुका कमळ चिन्हावरच लढविणार आहोत. ‘ना जातीचा ,ना पातीचा ,आमचा विजय आमच्या एकजुटीचा’ ,अशी घोषणा करत पॅनल प्रमुख गणेश वानकर यांनी सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला.

Tags: bjpcandidatesElectionganesh wankargaurdian minister jaykumar gorelokpravahlokpravahmedialokpravahnewsmla sachin kalyanshettiMla subhash deshmukhmla vijakumar deshmukhMunicipal corporationsolapurward 6

Recent Posts

  • कवठ्यात विकासाचा जागर : त्रिशिव हनुमान मंदिर सभागृहाचे भूमीपूजन; महिलांना शिलाई मशीन वाटप
  • सम्राट चौकात पाइपलाइन लिकेज; खड्डे व पाणी साचल्याने नागरिकांच्या जीवितास धोका
  • घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी पंढरपूरमध्ये धाड; एका विरुद्ध गुन्हा दाखल
  • एपस्टीन फाईल प्रकरण : वंचित बहुजन आघाडी 16 मार्चला करणार आंदोलन
  • 𝐆𝐌 संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अध्यक्षपदी अभी क्षिरसागर

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Top News
  • Uncategorized
  • अर्थकारण
  • कविता
  • क्रीडा
  • जाहिरात
  • जिल्हा
  • तालुका
  • देश
  • मनोरंजन
  • माझ सोलापूर
  • राजकारण
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • शहर
  • Home

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

© 2025