• Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
Sunday, March 29, 2026
  • Login
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
lokpravah.in
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

निमा डॉक्टरांच्या परिषदेत रुग्णसेवा आणि वैद्यकीय तंत्रज्ञानावर चर्चा

Lok Pravah by Lok Pravah
December 28, 2025
in Top News, जिल्हा, तालुका, माझ सोलापूर, शहर
0
निमा डॉक्टरांच्या परिषदेत रुग्णसेवा आणि वैद्यकीय  तंत्रज्ञानावर चर्चा
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर दि. 28 : नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा), सोलापूर शाखा आणि एसीएस हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी “एसीएस निमाकॉन २०२५” या भव्य राज्यस्तरीय वैद्यकीय परिषदेचे उद्घाटन महालक्ष्मी बँक्वेट्स, सोलापूर येथे निमाचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. आशुतोष कुलकर्णी यांचे हस्ते करण्यात आले.

यावेळी एसीएस हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉ.राहुल कारीमुंगी, डॉ. प्रमोद पवार, ,डॉ. दीपक गायकवाड- पाटील उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून निमा केंद्रीय शाखेचे डॉ. शांतीलाल शर्मा, डॉ. विनायक टेंभुर्णीकर, डॉ. गजानन पडघन, डॉ .सायबू गायकवाड, डॉ.शैलेश निकम, डॉ. वैशाली पडघन, राज्य शाखेचे अध्यक्ष डॉ. राजू ताटेवार, डॉ साधना कुलकर्णी, डॉ. मृण्मयी मासोदकर, डॉ. पल्लवी माने, डॉ. प्रशांत देशमुख , डॉ. तुषार सूर्यवंशी , डॉ. अभय लुणावत डॉ. रविराज गायकवाड, डॉ. अनुश्री मुंढेवाडी, डॉ. राजश्री मठ उपस्थित होते.

समाजातील रुग्णांना उच्च प्रतीची वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील नवीन संशोधन व तंत्रज्ञान आणि प्रगत उपचार पद्धतींची माहिती इंटिग्रेटेड प्रॅक्टिशनर्स डॉक्टरांना मिळावी असा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे असे निमाचे माजी केंद्रीय अध्यक्ष सोलापूरचे डॉक्टर विनायक टेंभुर्णीकर यांनी सांगितले.

उद्घाटन सोहळा दरम्यान निमा वुमन फोरम यांनी बनविलेल्या निमा डायरीचे व सोलापूर शाखेच्या सोविनियरचे प्रकाशन उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.

हृदयरोग तज्ञ डॉ. राहुल कारीमुंगी डॉ. प्रमोद पवार डॉ.दीपक गायकवाड पाटील यांनी हृदय रुग्णांना आधुनिक एआय आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून अवघड हृदय शस्त्रक्रिया व हृदयरोग उपचारातील नवीन उपकरणे यांचे प्रात्यक्षिक उपस्थित डॉक्टरांसमोर सादर केले.

डॉ. सुनील हिलालपुरे यांनी रक्ता संदर्भातील कॅन्सर , रक्तक्षय इ आजाराचे योग्य वेळेत निदान व उपचाराची माहिती उपस्थित डॉक्टरांना दिली. डॉ. मीनल चिडगुकर यांनी स्त्रियांना होणाऱ्या विविध आजार आणि वंध्यत्व सारख्या आजारांवर आजारांवर एआय टेक्नॉलॉजीचा वापर करून निदान आणि उपचार बद्दल माहिती दिली.

डॉ. रणजीत कदम यांनी मेंदूला आघात झालेल्या रुग्णांचे निदान आणि उपचार यामध्ये होणाऱ्या नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर आणि गोल्डन अवर मध्ये मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्यावर रुग्णांना कसे वाचवायचे याबद्दल माहिती दिली.

डॉ.प्रशांत धोंड यांनी उलटी जुलाब होऊन बीपी कमी झालेल्या रुग्णांना तात्काळ उपचार दिल्यास त्यांचे प्राण आपण कसे वाचवू शकतो याची माहिती उपस्थित डॉक्टरांना दिली.

डॉ. सपळे( त्वचारोग तज्ञ ) यांनी सध्या सामान्य नागरिकांना भेडसावत असणाऱ्या त्वचेच्या फंगल इन्फेक्शन संदर्भात योग्य औषधोपचार योग्य वेळेपर्यंत कसा करायचा याची माहिती डॉक्टरांना दिली.

डॉ. विनोद बन यांनी “खोकला” या एका लक्षणाला धरून आणि त्या संदर्भातील आजारांमुळे एखाद्या रुग्णाच्या जीवनात काय काय घडू शकते आणि डॉक्टर त्याचे निदान करून कशाप्रकारे उपचार करू शकतात याबद्दल सविस्तर माहिती दिली.

लिव्हर विकार तज्ञ डॉ. सुजित जहागीरदार यांनी लिव्हरच्या आजारा संदर्भात सोलापूर मध्ये असलेल्या विविध उपचाराच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती दिली आणि लिव्हर खराब झालेल्या रुग्णांना वाचवून त्यांचे राहणीमान कशा पद्धतीने आनंददायी करू शकतो याबद्दल मार्गदर्शन केले.

डॉ. प्रफुल्ल कल्याणकर यांनी डॉक्टरांना आर्थिक गोष्टींचे नियोजन काटेकोरपणे कसे करायचे आणि त्यायोगे कमी पैशांमध्ये रुग्णांची उच्च प्रतीची सेवा कसे करायचे याची सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ” ACS निमाकॉन २५ “चे डॉ. सुभाष भांगे, डॉ.अमोल माळगे, डॉ . आसिफ शेख, डॉ.अभिजित पुजारी, डॉ. नितीन बलदवा, डॉ. नागनाथ जिड्डीमनी, डॉ.प्रवीण ननवरे, डॉ.श्रुती मराठे डॉ. अश्विनी देगावकर डॉ. पल्लवी भांगे , डॉ. समर्थ वाले, डॉ .आयाचित डॉ.उत्कर्ष वैद्य यांनी परिश्रम घेतले.

NCISM च्या नियमानुसार बीएएमएस व बीयूएमएस डॉक्टरांना अभ्यासक्रमात समाविष्ट असणाऱ्या शस्त्रक्रिया करण्याची परवानगी देणारा जीआर काढण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील शल्य व शालाक्य विभागातील पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्याची तरतूद अबाधित राहिली पाहिजे. – डॉक्टर राजू ताटेवार अध्यक्ष निमा महाराष्ट्र-

-आयुर्वेद व युनानी पदवीधारकांसाठी ऍलोपॅथी प्रॅक्टिस संदर्भात राष्ट्रीय स्तरावर एकच कायदा अस्तित्वात यावा. अभ्यासक्रम एकच असूनही काही राज्यांमध्ये आलोपथी परवानगी आहेत तर काही राज्यांमध्ये नाहीये तर त्यानुसार सर्व राज्यांमध्ये देशपातळीवर एकच कायदा असावा – डॉक्टर आशुतोष कुलकर्णी अध्यक्ष निमा सेंट्रल– शासकीय सेवेत असणाऱ्या कंत्राटी बी ए एम एस डॉक्टरांना कायम करण्यासंदर्भात महाराष्ट्र सरकारने जी आर काढला आहे. त्याची त्वरित अंमलबजावणी होऊन सर्व कंत्राटी बीएमएस डॉक्टरांना कायम करून घ्यावे. ग्रामीण भागात सेवा पुरवणाऱ्या सीएचओ यांच्या बेसिक मध्ये वाढ करून त्यांनाही शासकीय सेवेत कायमस्वरूपी समाविष्ट करून घ्यावे.

डॉ. शैलेश निकम ( केंद्रीय निमा उपाध्यक्ष )–सदर परिषदेच्या उद्घाटनासाठी गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत अपरिहार्य कारणामुळे उपस्थित राहू शकले नाही. त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून डॉक्टरांशी संवाद साधला.

इंटिग्रेटेड प्रॅक्टिस ही काळाची गरज असून आपण स्वतः देखील निमा संघटनेचा भाग असून कोविड काळात निमाने केलेल्या रुग्णसेवेचा उल्लेख करीत पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या आयुर्वेदाला जागतिक पातळीवर नेण्याच्या प्रयत्नाला यश येण्यासाठी आयुर्वेदामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा व संशोधनाचा वापर वाढला पाहिजे त्यासाठी शासनाकडून भविष्यात आणखी प्रयत्न केले जातील असे माननीय मुख्यमंत्री यांनी कॉन्फरन्स दरम्यान सांगितले.

Tags: doctorlokpravahlokpravahnewsMunicipal corporationnew technologiesnimasolapur

Recent Posts

  • कवठ्यात विकासाचा जागर : त्रिशिव हनुमान मंदिर सभागृहाचे भूमीपूजन; महिलांना शिलाई मशीन वाटप
  • सम्राट चौकात पाइपलाइन लिकेज; खड्डे व पाणी साचल्याने नागरिकांच्या जीवितास धोका
  • घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी पंढरपूरमध्ये धाड; एका विरुद्ध गुन्हा दाखल
  • एपस्टीन फाईल प्रकरण : वंचित बहुजन आघाडी 16 मार्चला करणार आंदोलन
  • 𝐆𝐌 संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अध्यक्षपदी अभी क्षिरसागर

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Top News
  • Uncategorized
  • अर्थकारण
  • कविता
  • क्रीडा
  • जाहिरात
  • जिल्हा
  • तालुका
  • देश
  • मनोरंजन
  • माझ सोलापूर
  • राजकारण
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • शहर
  • Home

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

© 2025