सोलापूर, दि. २९ : दिव्यांग (अंध) महिलांच्या पहिल्या विश्वचषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत भारताने विजेतेपद पटकाविले. त्या संघात उपकर्णधार गंगा कदम हिचा समावेश होता. ती सोलापुरात विमानाने रविवारी दुपारी दोन वाजता येणार आहे. सोलापुर विमानतळावर भैरूरतन दमाणी अंध शाळेच्या वतीने तिचे स्वागत करण्यात येणार आहे.
सोलापूर विमानतळापासून ते दमाणी नगरपर्यंत भव्य रॅली काढण्यात येणार आहे. भैरूरतन दमाणी अंधशाळेत या रॅलीची सांगता होणार आहे. तरी सोलापुरातील क्रीडा प्रेमींनी उपस्थित राहून तिला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन तिचे प्रशिक्षक राज शेळके यांनी केले आहे.
विजेत्या महिला संघाचा सन्मान १६ डिसेंबरला करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून निरोप आला असल्याचेही शेळके यांनी सांगितले

