• Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
Saturday, March 28, 2026
  • Login
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
lokpravah.in
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

सोलापूरात बिनविरोधसाठी भाजपाचे दबावतंत्र : खासदार प्रणिती शिंदे

Lok Pravah by Lok Pravah
January 3, 2026
in Top News, जिल्हा, तालुका, माझ सोलापूर, शहर
0
सोलापूरात बिनविरोधसाठी भाजपाचे दबावतंत्र : खासदार प्रणिती शिंदे
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर दि. ३ : सोलापुरात भाजपला उमेदवार मिळत नसल्याने इतर पक्षातील उमेदवार आयात केले आहेत. तसेच निवडणूक बिनविरोध करण्यासाठी दबाव तंत्राचा वापर करत आहे. यामुळे सोलापुरात महापालिका निवडणुकीमध्ये खून होण्याची घटना घडली आहे, असे खासदार प्रणिती शिंदे यांनी म्हटले.

सोलापुरात सुरू असलेल्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांच्या हत्येने शहरातील राजकारणाला गंभीर वळण मिळाले आहे. या प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविका व प्रभाग क्रमांक २ च्या उमेदवारासह तब्बल १५ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून संबंधित परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

या घटनेवर प्रतिक्रिया देताना काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “सोलापुरात थेट खून होतो, ही अतिशय गंभीर बाब आहे. भाजपकडे उमेदवार नसल्यामुळे बिनविरोध निवडणुकांसाठी दबावतंत्राचा अवलंब केला जात आहे, ही लाजिरवाणी परिस्थिती आहे,” असा आरोप त्यांनी केला.भाजपला सर्वच प्रभागांत बिनविरोध निवडणुका हव्या असून त्यासाठी उमेदवारांना धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप करत प्रणिती शिंदे म्हणाल्या की, “बंडखोर उमेदवारांवरही दबाव टाकला जात आहे. पालकमंत्र्यांनी त्यांच्या पदाची किमान प्रतिष्ठा तरी राखली पाहिजे. एवढ्या खालच्या पातळीवर निवडणुका लढवल्या जात असतील तर लोकशाही कुठे टिकणार?”प्रणिती शिंदे यांनी निवडणूक प्रशासनावरही तीव्र टीका केली.

सोलापुरातील निवडणूक अधिकारी अद्याप अंतिम उमेदवार यादी जाहीर करत नाहीत, दिलेल्या आकडेवारीत तफावत आढळते, तसेच निवडणूक केंद्रांच्या परिसरात कायम गोंधळाची स्थिती असल्याचे त्यांनी नमूद केले. “त्या दिवशी शंभर टक्के भाजपने खिडकीतून ए.बी. फॉर्म दिले,” असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

अर्ज माघारीसाठी उमेदवारांना फरपटत नेल्याचे आरोप करत प्रणिती शिंदे म्हणाल्या की, “आता झालेल्या हत्येबाबत भाजपकडून हे कौटुंबिक वादाचे प्रकरण असल्याचे सांगितले जाईल. मात्र, सत्य जनतेसमोर येईलच.”

शेवटी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी विचारले की, “जर प्रशासनातील अधिकारी महाविकास आघाडी किंवा इतर विरोधी पक्षांना साथ देणार नसतील, तर लोकांनी न्यायासाठी कुणाकडे पाहायचे?”या आरोपांमुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून आगामी निवडणुकीत हा मुद्दा केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे.

Tags: Electionlokpravahlokpravahmedialokpravahnewsmp praniti shindeMunicipal corporationmurdersolapursolapur municipal corporation

Recent Posts

  • कवठ्यात विकासाचा जागर : त्रिशिव हनुमान मंदिर सभागृहाचे भूमीपूजन; महिलांना शिलाई मशीन वाटप
  • सम्राट चौकात पाइपलाइन लिकेज; खड्डे व पाणी साचल्याने नागरिकांच्या जीवितास धोका
  • घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी पंढरपूरमध्ये धाड; एका विरुद्ध गुन्हा दाखल
  • एपस्टीन फाईल प्रकरण : वंचित बहुजन आघाडी 16 मार्चला करणार आंदोलन
  • 𝐆𝐌 संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अध्यक्षपदी अभी क्षिरसागर

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Top News
  • Uncategorized
  • अर्थकारण
  • कविता
  • क्रीडा
  • जाहिरात
  • जिल्हा
  • तालुका
  • देश
  • मनोरंजन
  • माझ सोलापूर
  • राजकारण
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • शहर
  • Home

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

© 2025