मोहोळ दि. 26 : कॉलेजला येत असताना भरधाव टेम्पोने तरुणीच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एक जागीच मृत्यू झाली असून तर दुसरी मुलगी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास नजिक पिंपरीच्या हद्दीत घडली.
प्रज्ञा धनाजी कोकाटे (वय १७, रा. तांबोळे, ता. मोहोळ) ही जागीच मृत्यू झाली.
प्रजा धनाजी कोकाटे हि नेताजी महाविद्यालय (मोहोळ) येथील इ ११वी सायन्स मध्ये शिक्षण घेत होती. दुचाकीवरून कॉलेजकडे निघाले असताना समोरून येणाऱ्या भरधाव वेगाने (MH 13 EP 0019) या टॅम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ मदत करत जखमी स्नेहल काशिनाथ वाघमोडे( वय १७ इ रा नजिक पिंपरी) मोहोळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी सोलापूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच मोहोळ पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. टेम्पो चालकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून भरधाव वाहनांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांतून होत आहे.
