सोलापूरचा दि. 10 : आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मातोश्री लीलावती देशमुख यांचे नुकतेच निधन झाले होते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी काळजापूर मारुती येथील सिद्धलीला या आमदार विजयकुमार देशमुख यांच्या निवासस्थानी भेट देत कुटुंबीयांचे सांत्वन केले.

यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, डॉ. किरण देशमुख, पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सुभाष देशमुख, आमदार समाधान आवताडे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, शिवानंद पाटील, अमर पुदाले तसेच प्रसाद कुलकर्णी, केदार उंबरजे, उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी देशमुख कुटुंबीयांशी संवाद साधत दुःखात सहभागी असल्याची भावना व्यक्त केली.
