सोलापूर दि. 8 : डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांनी दुसऱ्या जागतिक महायुद्धात जपानी आक्रमणावेळी चीनमध्ये येऊन केलेल्या लष्करी रुग्णसेवेचा आम्हाला अभिमान आहे. त्या सेवेकरीता चीन शासन सदैव डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या ऋणात राहील, असे प्रतिपादन चीनचे कॉन्सुल जनरल चिन जिये यांनी आपल्या प्रतिनिधीमंडळासह स्मारकाला भेट देत या महान मानवतावादी वैद्यकवीराला अभिवादन केले.

त्यांच्या या भेटीमुळे भारत–चीन मैत्रीचं ऐतिहासिक बंध अधिक दृढ झाल्याची भावना सर्वांनी व्यक्त केली. चीनचे कॉन्सुल जनरल चिन जिये यांच्यासह शिष्टमंडळाने सोमवारी सकाळी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक येथील डॉ.द्वारकानाथ कोटणीस स्मारकास भेट दिली. यावेळी महापालिकेचे आयुक्त डॉ.सचिन ओम्बासे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर चीनचे कॉन्सुल जनरल चिन जिये व आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी द्वारकानाथ कोटणीस यांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
महापालिकेचे आयुक्तांनी सांगितले की,“डॉ. कोटनीस यांच्या स्मृतिस्थळाला चीनच्या कॉन्सुल जनरल यांची भेट मिळणे ही सोलापूर शहरासाठी गौरवास्पद घटना आहे. या भेटीमुळे सांस्कृतिक आणि मानवी मैत्रीचे बंध आणखी दृढ होतील.”स्मारक भेटीदरम्यन महापलिका आयुक्त डॉ सचिन ओम्बासे यांनी डॉ. कोटनीस यांचे जीवनकार्य, दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील त्यांचे चीनमधील वैद्यकीय सेवाकर्म आणि भारत–चीन मैत्रीतील त्यांच्या मोलाच्या योगदानाची माहिती प्रतिनिधीमंडळाला दिली.तसेच त्यांनी स्मारकातील दस्तावेज, पुरावे, छायाचित्रे, वैद्यकीय साधने तथा ऐतिहासिक नोंदी यांचेही सविस्तर माहिती दिली.
कॉन्सुल जनरल चिन जिये यांनी स्मारकातील विविध विभागांना भेट देत दिली त्याची माहिती डॉ. कोटनीस मेमोरियल, सोलापूरचे सदस्य प्रा. गणेश चन्ना यांनी दिली डॉ. कोटनीस यांचे डॉ. कोटनीस यांच्या सेवाभावाचे अभिवादन केले. त्यांच्या भेटीदरम्यान त्यांनी दोन्ही देशांतील संस्कृती, आरोग्य सेवा, मानवतावादी कार्य याबाबत अधिक सहकार्य वाढविण्याची इच्छाही व्यक्त केली.
चीनचे जनरल माओ स्ते यांनी त्यावेळी पाठविलेले कृतज्ञता संदेश पत्राचे अवलोकन केले व सोलापूर महानगरपालिकेतर्फे जतन केलेल्या स्मारकाबाबत कृतज्ञता व्यक्त करून स्मारकाबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी झोउ वेन्टिंग, चिन जिये यांची पत्नी,चेन हुआझू, सीईओ – यॅप इंडिया,वांग जिनशेंग, कॉन्सुल, जी झ्यूकुई, कॉन्सुल, शियोंग फांगशिंग, उप- कॉन्सुल,डोंग ली, व्हाईस कॉन्सुल, व्हाईस,झू युचियान,व्हाईस कॉन्सुल, नगर अभियंता सारिका आकूलवार, अंतर्गत लेखा परीक्षक राहुल कुलकर्णी, सह. अभियंता प्रकाश दिवानजी, जयदीप टाव्हरे, कामगार कल्याण अधिकारी अजितकुमार खानसोळे, उद्यान प्रमुख स्वप्नील सोलनाकर, जनसंपर्क अधिकारी गणेश बिराजदार आदी उपस्थित होते.
