सोलापूर दि. 10 : बहुजन समाज पार्टीचे प्रभाग क्रमांक 1 चे उमेदवार बबलू गायकवाडसह सर्व उमेदवारांच्या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

प्रभाग क्र. १ बहुजन समाज पार्टी. बटन – ३ बबलू गायकवाड (१– अ), बटन – ३ शहनाज मोमीन (१–ब)बटन –५, भागिरथी शिंदे (१ – क)बटन – ९, रतन साहेब भोसले (१–ड) (पुरस्कृत उमेदवार) यांना मतदारांनी भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.
यावेळी बोलताना गायकवाड म्हणाले की मागील १० वर्ष प्रभागात कामं झालेली नाहीयेत. भाजप उमेदवारांकडून होणारी जनतेची फसवणूक, त्यांच्या मतांशी आणि भावनेशी खेळ करून अन्यायाचा पारा या प्रभागात वाढलेला आहे ,असे नमूद केले.
घरोघरी जाऊन तेथील आई–भगिनी, वडील धारक मंडळी यांच्या आशीर्वाद घेतले. भाजपला या प्रभागात थारा नाही असे नमूद केले. हा प्रभाग सुजलाम सुफलाम केल्या शिवाय मी गप्प बसणार नाही. या वेळी पॅनल बसवा असा आंबेडकरी विचार मी जनतेच्या मनामनात ठासवणार असे आपले मत त्यांनी व्यक्त केले.
