सोलापूर दि. 16 : सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी, सोलापूर शहर जिल्ह्याच्या अध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर महानगरपालिका इच्छुक उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. अर्ज सादर केलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती कोअर कमिटी सदस्यांच्या मार्फत सिव्हील चौक येथील भाजपा पक्ष कार्यालयात खालीलप्रमाणे वेळापत्रकानुसार घेण्यात येणार आहेत.

मुलाखतींसाठी येताना इच्छुक उमेदवारांनी वैयक्तिक स्वरूपात (एकट्याने) उपस्थित राहावे.मुलाखतीदरम्यान कोणत्याही प्रकारचे शक्तीप्रदर्शन, वाद्ये, घोषणाबाजी, समर्थकांची गर्दी अथवा अनावश्यक गोंधळ पूर्णतः टाळावा.पक्षाची शिस्त, संघटनात्मक मर्यादा व निवडणूक आचारसंहितेचे पालन करून ही प्रक्रिया राबविण्यात येत असून, सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टी, सोलापूर शहर जिल्हा कार्यालय प्रमुख श्री.श्रीहरी म्याकल यांच्या वतीने करण्यात येत आहे.
मुलाखतीचे वेळापत्रक. दिनांक वेळ प्रभाग1. 6-12-2025 स. 9 ते दु. 2 प्र. क्र1 ते 5. 16-12-2025 दु. 3 ते सायं.7 प्र. क्र 6 ते 10 17-12-2025 स. 9 ते दु. 2. प्र. क्र. 11 ते 15 17-12-2025 दु. 3 ते सायं.7 प्र. क्र. 16 ते 20 18-12-2025 स. 9 ते दु. 2 प्र. क्र. 21 ते 23 18-12-2025 दु. 3 ते सायं. 7 प्र. क्र 24 ते 26
