सोलापूर दि. 14 : सोलापूर महानगरपालिकेचे उद्या गुरुवारी मतदान आहे. या मतदानासाठी मतदारांना आपला ओळख पुरावा दाखवावा लागणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने जे छायाचित्र असलेले मतदान कार्ड पुरवले आहे, तो पुरावा ग्राह्य राहील. त्याशिवाय एकूण बारा पुरावे ग्राह्य धरण्यात येणार आहे.
आधार कार्ड, पासपोर्ट, पॅन कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतील ओळखपत्र, निवृत्ती वेतन ओळखपत्र , लोकसभा राज्यसभा सचिवालय तसेच विधानसभा विधान परिषदेचे ओळखपत्र, स्वातंत्र्यसैनिक ओळखपत्र, श्रम मंत्रालयाने दिलेली विमा कार्ड
