सोलापूर दि. 13 : सम्राट चौक येथील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यामागे मागील 5 दिवसापासून पाण्याची पाईप लाईन लिकेज झाली आहे. तसेच येथून जड वाहतुक मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे येथे खड्डे पडून त्यात पाणी साचले आहे. याचा परिणाम मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. तरी प्रशासनाने त्वरित लक्ष घालून ही समस्या सोडविण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
मागील 15 दिवस अगोदर अशी पाणी गळती झाली होती. नागरिकांच्या तक्रारी नंतर ती दुरुस्त करण्यात आली. परंतु 15 दिवस झाले तर पुन्हा ही पाणी गळती सुरू झाली आहे.
सध्या दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू असून विद्यार्थी व पालक यांची गर्दी या रस्तावर जास्त आहे. तरी निकृष्ट काम करणारे ठेकेदार यांच्या वर कारवाई करावी व या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी येथील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते यांनी सोलापूर महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्याकडे केली.
